समाजसुधारकांचा वर्ग
प्रत्येक वर्ग तत्त्वे आपल्या वर्गाच्या दृष्टीने किंवा आपल्या विशिष्ट अनुभवाच्या दृष्टीने मांडीत असतो. त्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करताना तत्त्वे मांडणारांचा वर्ग कोणता होता आणि त्यांची परिस्थिती काय होती याचा नि चय आपणास केला पाहिजे. सामाजिक भावना आणि शासनसंस्था यांचा निकट संबंध असला तरच सामाजिक सुधारणेस प्रवृत्ती होणार आणि कर्तव्यात्मक समाज-शास्त्राची उत्पत्ती होणार. सामाजिक भावना असेल …